उद्देश व स्वरुप :
आदिवासी युवकांकरिता स्थानिक गरजांवर आधारित लहान लहान प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून त्यांना स्वयंरोजगाराची संधी देणे, तसेच आदिवासी भागातील लोकांना अत्यंत गरजेची यंत्रे व अवजारे स्थानिकरित्या दुरुस्त करुन घेण्याच्या दृष्टीने कुशल कारागीर उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ही व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे सध्या 4 निवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळांमध्ये सुरु करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रीशिअन, ऑईल इंजिन / इलेक्ट्रिक मोटार दुरुस्ती, मोटार मॅकॅनिक इ. अभ्यासक्रम शिकविले जातात. प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने असतो. एका सत्रात 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. प्रशिक्षणार्थींच्या इच्छेनुसार 3 प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण त्याला घेता येईल.
या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीस दरमहा रु.400/- विद्यावेतन तसेच प्रशिक्षणानंतर 3 महिने शहरी भागातील कार्यशाळेत प्रात्यक्षिकांची संधी, आवश्यक कच्चे साहित्य व अनुषंगिक अवजारे पुरविण्यात येतात.
पात्रतेच्या अटी :
- 1. प्रशिक्षणार्थी अनुसूचित जमातीचा असावा व इ.9 वी पर्यंत शिक्षण झालेले असावे.
संपर्क :
संबंधित पोस्ट बेसिक आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व संबंधित क्षेत्राचे प्रकल्प अधिकारी केंद्र शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा (1)कोटगूल ता.कोरची जि.गडचिरोली (2) कसनसूर ता.भामरागड जि.गडचिरोली (3) विनवल ता.जव्हार जि.ठाणे (4) पाथरज ता.कर्जत जि.रायगड (5) पळसून ता.कळवण जि.नाशिक (6) भांगरापाणी ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार (7) केळीरुम्हणवाडी ता.अकोले (8) वाघझिरा ता. यावल (9) गोहे ता.आंबेगाव (10) कपरा ता.बामूळगाव (11) सारखणी ता. किनवट (12)राणीगाव ता. धरणी (13) कवडस ता. हिंगणा (14)कहीकसा ता.देवरी (15) देवाडा ता. राजूरा.