आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.
आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांतर्गत सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण...(अधिक माहिती)
४९० शासकीय वसतीगृहे कार्यरत असून सदर वसतीगृहांमध्ये सन २०१४-१५ यामध्ये ५५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत ५२८ शासकीय आश्रमशाळा व ५५६ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत असून सन २०१४-१५ यामध्ये अनुक्रमे सुमारे १ लाख ९६ हजार व २ लाख ५३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.