रस्ते विकास
आदिवासी लोकांचा झपाटयाने विकास करण्याच्या दृष्टीने आदिवासी क्षेत्रामध्ये दळणवळण सुविधा अत्यंत महत्वाची व आवश्यक आहे. योग्य रस्ते नसल्यामुळे आदिवासी लोकांना आरोग्य केंद्र, बाजार केंद्र, शैक्षणिक केंद्र इत्यादी आवश्यक सेवांचा लाभ घेता येत नाही. दळणवळणासाठी रस्ते असल्यास पुढील गोष्टी उपलब्ध होतात.
- प्राथमिक शिक्षणानंतरच्या शिक्षणाच्या सुविधा, आरोग्यविषयकय सुविधा आणि रोजगार सुविधा प्राप्त करुन घेतात येतात.
- अत्यावश्यक वस्तु त्या भागामध्ये आणता येतात आणि स्थानिक उत्पादित वस्तु बाहेर विक्रीसाठी नेता येतात.
- वेतनी रोजगार मिळतो आणि
- लवकरात लवकर गाऱ्हाणी दूर करण्याच्या दृष्टीने शासनाशी थेट संपर्क साधता येतो आणि लोकांमधील जागृती वाढीस लागते.
2014-15 या वर्षासाठी रु.50046.08 लाख एवढ़या नियतव्ययाची तरतूद करण्यात आली आहे. हा नियतव्यय जिल्हा मार्ग, पोच रस्ते, आणि जोडरस्ते इ.साठी देण्यात आलेला आहे. तसेच
2014-15 या वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेमध्ये रस्तेविकास या उपविकास क्षेत्रासाठी पुढीलप्रमाणे नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
अ.क्र. |
बाब |
व्यय (रुपयेलाखांत) |
|
राज्यस्तरीययोजना |
20000.00 |
|
रस्ते (ग्रामविकासविभाग) |
5000.00 |
|
गृहपरिवहन |
500.00 |
|
जिल्हामार्ग (किमानगरजाकार्यक्रमाव्यतिरिक्त) |
14414.20 |
|
जिल्हामार्ग (किमानगरजाकार्यक्रम) |
9238.31 |
|
आदिवासीवस्त्यांसाठीजोडणारेरस्ते |
209.98 |
|
डोगराळक्षेत्रामध्येसाकव (फूटब्रिज) बांधणे |
648.05 |
|
आश्रशाळांनाजोडरस्ते |
35.54 |
|
प्राथमिकआरोग्यकेंद्रांना उपकेंंद्रानाजोडरस्ते |
0.00 |
|
एकूण |
50046.08 |